पार्ले-जीच्या पॅकेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो; Parle-G गर्लचा फोटो का बदलला?
Parle G Biscuit Replaces Iconic Girls Image: पार्लेजी हे बिस्किट अनेकांचे आवडते बिस्किट आहे. अगदी लहानपणांपासून तुम्ही हे बिस्किट खात असाल पण या बिस्किटच्या पॅकेटवर आता भलत्याच तरुणाचा फोटो छापला आहे.
Parle G Biscuit Post: पार्ले-जी हे बिस्किट भारतात खूपच लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच चहासोबत पारले-जी बिस्किट खाण्यास आवडते. पार्ले-जी बिस्कीटाची आणखी एक खासियत म्हणजे बिस्किटच्या कव्हरवर असलेल्या चिमुरड्या मुलीचा फोटो. पण आता पार्लेजीच्या कव्हरवर मात्र एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो छापण्यात आला आहे. सोशल मीडियावर तशी एक पोस्ट सध्या व्हायरल होतंच. पार्लेजीने हा बदल नेमका का केलाय? याचे कारण वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.
सोशल मीडियावर पार्लेजी कंपनीकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये बिस्कीटाच्या कव्हर फोटोवर पार्ले-जी गर्लऐवजी कंटेट क्रिएटर जेरवान जे बुन्शाह (Content Creator Zervaan J Bunshah) ह्याचा फोटो छापण्यात आला आहे. सुरुवातीला ही पोस्ट पाहून सारेच चकित झाले आहेत. पण नेमकं असं काय घडलं हे जाणून घेऊयात.
बन्शाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत त्याने त्याच्या फॉलोअर्सना एक प्रश्न विचारला आहे. त्याने व्हिडिओत विचारलं आहे की, जर तुम्ही पार्ले जीच्या मालकांना भेटाल तर त्यांना तुम्ही पार्ले-सर, मिस्टर पार्ले किंवा पार्ले-जी या नावाने हाक माराल का? या व्हिडिओत बुन्शाहने चेहऱ्यावरही गोंधळलेले भाव आणले आहेत. तर, बॅकग्राउंडमध्ये ऐ जी ओ जी हे गाणं ठेवण्यात आलं आहे.
पार्ले-जीची ही क्रिएटिव्ह पोस्ट बुन्शाहला देखील खूपच आवडली आहे. त्यांनी पार्लेच्या या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की, लहान असताना मी हे बिस्किट खाताना हाच विचार करायचो की आता मी जिनियस होणार, असं बुन्शाहने म्हटलं आहे. इंटरनेटवर युजर्सनेही या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याला लकी म्हटलं आहे. तर, एकाने म्हटलं आहे की आता आम्हाला आमच्या पार्ले-जी बिस्किटच्या पॅकेटवर बुन्शाहचाच फोटो हवाय.