Parliament Security Breach : 13 डिसेंबर 2001 मध्ये संसद भवनावर 5 दहशतवाद्यांनी हल्ला (Parliament Attack) केला होता.. या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली.. त्यामुळे 22 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी चौघांना अटक केलीय. त्यापैकी दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. यातल्या एकाच सागर शर्मा तर दुसऱ्याचं नाव मनोरंजन आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची गुप्तचर संस्थांकडून चौकशी सुरू आहे. तर इतर दोघांनी संसदेच्या आवारात निदर्शन केली. त्यांनी स्मोक कँडलमधून (Smoke Candle) धूर सोडला. यातल्या एकाच नाव अमोल शिंदे (Amol Shinde) असं असून तो लातूरचा रहिवासी आहे, तर तरूणीचं नाव नीलम कौर सिंग असं आहे. ती हिस्सारची रहिवासी आहे. या आरोपींचा संसद भवनात गोंधळ घालणाऱ्या तरूणांशी संबंध आहे का? याचा तपास केला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे अमोल शिंदे?
याप्रकरणी अटक करण्यात आलेला अमोल धनराज शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला आहे. अमोल मूळचा लातूरच्या (Latur) चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा राहणारा आहे.. संसदेत दोघा तरुणांनी प्रेक्षक गॅलरीत उडी मारली... तर दोघांनी संसदेच्या आवारात निदर्शनं केली. स्मोक कँडलमधून त्यांनी धूर सोडला. त्यामध्ये अमोलचा समावेश होता. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी अमोल शिंदेला तत्काळ अटक केली. याप्रकरणी  पोलीस अमोल शिंदेच्या घरी दाखल झाले असून अमोल शिंदेच्या आई-वडिलांची चौकशी सुरू झालीय. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावातल्या घरी जाऊन पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलीय. 


भरतीसाठी जात असल्याचं सांगून बाहेर पडला
अमोल धनराज शिंदे हा 25 वर्षाचा तरुण आहे. घरची आर्थिक परिस्थिति बेताची असून अमोलचे आई वडील मजूरी करतात. अमोल शिंदे हा मिल्ट्री आणी पोलीस भरतीची तयारी करत होता. 9 तारखेला भरतीसाठी जात असल्याचे सांगून तो गेला होता. पण दिल्लीला कसा पोहोचला याबाबत पोलीस तपास करत आहेत. 


तरुणीचाही समावेश
 संसद भवनाबाहेर अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. नीलम सिंह असं तिचं नाव असून, ती हिस्सारची राहणारी आहे. या तरूणीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तानाशाही नही चलेगी, तानाशाही बंद करो... अशा घोषणा तिनं दिल्या..


खासदराच्या पासेसवर प्रवेश
संसदेत घुसखोरी करणारे तरूण ज्या खासदाराच्या पासेसवर प्रेक्षक गॅलरीत बसले होते त्या खासदार प्रताप सिन्हांची यांचीही चौकशी केली जातीय. प्रताप सिन्हा हे कर्नाटकाल्या म्हैसूरचे भाजप खासदार आहेत. आरोपींना पासेस देण्यासाठी कुणी शिफारस केली याचीही चौकशी होतीय. विशेष म्हणजे ज्या आरोपींना अटक करण्यात आलीय त्यांनी आपल्यासोबत कोणतेही फोन किंवा ओळखपत्र ठेवली नव्हती अशी माहितीही समोर येतीय.