नागपूर : राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी आणखी आर्थिक खड्ड्यात रुतली आहे. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नही घटले आहे.


15 कोटी 79 लाख प्रवाशांची घट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटीच्या प्रवासी संख्येत गेल्या पाच वर्षांत 15 कोटी 79 लाख प्रवाशांची घट झाली असून, त्यामुळे महामंडळाच्या तोट्यातही वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेमध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 


महामंडळाचा तोटा 1 हजार 807 कोटी


वर्ष 2015-16 च्या अखेरीस एसटी महामंडळाचा तोटा 1 हजार 807 कोटी रुपये एवढा होता. हाच तोटा 2016-17 या वर्षात तब्बल 2 हजार 312 कोटी रुपयांवर पोहोचला. त्यातच पंधराशे वातानुकूलित शिवशाही बसेस येत्या काळात रस्त्यावर उतरवल्या जाणार आहेत.


अशा परिस्थितीत प्रवासी संख्या वाढवण्यासोबतच महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याचं मोठं आव्हान एसटी महामंडळापुढे आहे.