VIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण
Pawan Kalyan Marathi Speaking : पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात येताच केलं मराठीमध्ये भाषण, अस्खलित मराठीतील व्हिडीओमुळे एकच चर्चा
Pawan Kalyan Marathi Speaking : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आले आहेत. आपला आवडता कलाकार आल्यानं त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. यावेळी पवन कल्याण यांना भाषण करताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं त्याचं कारण म्हणजे त्यांनी चक्क मराठीमध्ये भाषण केलं आहे.
पवन कल्याण हे काल 16 नोव्हेंबर शनिवारी रोजी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत स्टेजवर नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे होते. त्या दोघांच्या प्रचारासाठी पवन कल्याण हे पाळजला आले होते. त्यानंतर ते जितेश अंतापुरकरांच्या प्रचारार्थ देगलूर येथे सभा झाली.
पवन कल्याण यांनी यावेळी भाषण करत असताना सुरुवातीला मराठीतून केली. त्यांच्या भाषणाची सुरुवात करत ते म्हणाले, मी मराठीत बोलताना चुकलो तर मला माफ करा. त्याशिवाय या भाषणात त्यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पवन कल्याण म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर, कलम 370 सारखे कठोर निर्णय घेऊन देशाची आर्थिक बाजू मजबूत करण्याचं काम केलंय. त्याशिवाय त्यांनी देशाची आर्थिक स्थिती देखील मजबूत केली आहे.'
पुढे पवन कल्याण तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आवाहन करत म्हणाले की,'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत डॉक्टर संतुकराव हंबर्डे तर विधानसभेसाठी श्रीजया चव्हाण आणि जितेश अंतापुरकर यांच्या पाठीशी मतदारांनी उभं राहावं.'
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख
लाडकी बहीण योजनेविषयी बोलत पवन कल्याण म्हणाले, 'लाडकी बहीण योजने'च्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती होईल.'
मराठ्यांची भूमी स्वराज्याचं योग्य उदाहरण
पुढे पवन कल्याण म्हणाले, 'मी मराठ्यांच्या भूमिकेसाठी सगळ्यात खूप सन्मान आहे, जे स्वराज्याचं योग्य उदाहरण आहे. हे डॉ, बीआर आंबेडकर सारख्या महान नेत्याच्या भूमीवर आहे.'
बाळासाहेबांच्या आदर्शांनी प्रेरित
पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलत पवन कल्याण म्हणाले, 'जनसेनेच्या सात तत्वांपैकी एक - राष्ट्रवाद आणि प्रादेशिकता यांचे मिश्रण बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांनी प्रेरित आहे. एनडीएने राबवण्यात आलेल्या अनेक धोरणांमध्ये बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या भावना दिसून येतात.'