`या` गावात ट्रॅकटरचा साजरा केला वाढदिवस, डीजे लावून काढली मिरवणूक...
सिन्नर तालुक्यातील चास गावातील भारत खैरनार या शेतकऱ्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपला ट्रॅक्टरचा वाढदिवस डीजे लावून मिरवणूक काढत साजरा केला.
चेतन कोळस, झी मीडिया, येवला: आपला वाढदिवस जवळ आला की आपण कोण उत्साही होतो. त्या दिवसासाठी काय स्पेशल करायचे हे आपण महिनाभर आधीच ठरवायचा विचार करतो. त्यामुळे वाढदिवस म्हटलं की आपल्यासाठी ते एक सेलिब्रेशनच (Birthday Celebration) असतं. त्यामुळे आपण कायच एक्साईडेड असतो. हल्ली लोकं प्राण्यांचाही वाढदिवस साजरा करतात. त्यांच्या बर्थडेसाठीही भरपूर प्लॅनिंग (Planning) आणि भेटवस्तू आणत जग्गी सेलिब्रेशन (Celebration) करतात. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का की यंदा प्राणी, पक्षी सोडाच या गावात तर चक्क एका ट्रॅकटरचाच वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. वाटलं ना आश्चर्य. हो या गावकऱ्यांनी चक्क आपल्याला शेतात मदत करणाऱ्या ट्रॅकटरचाच वाढदिवस साजरा केला आहे. (people celebrates tracker birthday farmers yeola maharashtra news marathi)
सिन्नर तालुक्यातील चास गावातील भारत खैरनार या शेतकऱ्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपला ट्रॅक्टरचा वाढदिवस डीजे लावून मिरवणूक काढत साजरा केला असून यावेळी जवळजवळ हजार लोकांच्या आसपास लोकांना आमंत्रण या वाढदिवसानिमित्त देण्यात आले होते शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीची कामे ट्रॅक्टरच्या साह्याने केला जात असल्याने हा शेतकरी नेहमीच दरवर्षी हा ट्रॅक्टरचा वाढदिवस साजरा करत असतो.
पाहा कसा चमकलं कबूदर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये :
पशु-पक्षी (Pet) पाळणे हा अनेकांचा छंद असतो त्यामाध्यमातून अनेक नागरिक आपल्या पशु पक्षामुळे नावारूपाला येत असताना नुकतेच पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील एका कबुतराने आपल्यासह आपल्या मालकाचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) मध्ये नोंद केले आहे. तळेगाव ढमढेरे येथील सोयब बागवान या युवकाला कबुतरे पाळण्याचा छंद असून त्याने अनेक कबुतरे पाळलेली आहेत. त्यापैकी काही कबुतरे शर्यतीमध्ये सहभागी होणारी असून सोयब याने यापूर्वी मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याच्या बुलेट राजा (Bullet Raja) या कबुतराच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.