सातारा : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तरी देखील नागरिक कोणत्याही गोष्टींची तमा नबाळगता शासनाकडून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. साताऱ्यामधील भाजीमंडईत रोज सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत असल्याचं चित्र समोर येत आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सर्व व्यवहार सुरु करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात पहाटे ६ वाजल्यापासून लोक भाजीमंडईमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अनेक जण विनामास्क फिरत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनाला आणून देखील त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे. एकंदर नागरिकांच्या अशा वर्तवणुकीमुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १० लाख १५ हजार ६८१ आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत २८ हजार ७२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २ लाख ७१ हजार ५६६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.


गेल्या काही दिवसांपासुन देशात दररोज ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाखांवर पोहोचली असून, गेल्या २४ तासांमध्ये ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. तर १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४६ लाख ५९ हजार ९८५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.