हिंगणघाट जळीतकांड पीडितेच्या मृत्यूनंतर गावात उसळला जनक्षोभ
पीडितेच्या दारोडा गावात तणावपूर्ण वातावरण
वर्धा : पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या गावात जनक्षोभ उसळलाय. पीडितेच्या दारोडा गावात तणावपूर्ण वातावरण आहे. इथल्या ग्रामस्थांनी नागपूर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको केला आहे. जो त्रास पीडितेला झाला तोच त्रास आरोपीलाही द्या अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलीय. आरोपीला आमच्या स्वाधीन करा त्याशिवाय पीडितेचं पार्थिव गावात आणू देणार नाही असा पवित्रा दारोडाच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.