पुणे : पुणे सातारा या महामार्गावर हरिशचंद्र गावातील लोकं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहे. गावाला उड्डाण पूल नसल्याने अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. याबाबत शासनाकडे पाठ पुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने गावकरी आणि प्रहार पक्षाचे कार्येकर्ते अखेर पाण्याच्या टाकीवर चढले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावकऱ्यांना शोले स्टाईलने आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत संबंधित आधिकरी किंवा दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत टाकीवर बसून आंदोलन चालूच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे. पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांना खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.


आपल्या मागणीसाठी गावकऱ्यांनी हे अनोखं आंदोलन करुन प्रशासनाचं लक्ष त्यांच्याकडे ओढलं आहे. त्यामुळे आतातरी प्रशासन त्यांना लवकरात लवकर पूल बनवून देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.