महाबळेश्वरमध्ये स्वच्छतेसाठी भिंती बोलू लागल्या...
महाबळेश्वर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. मात्र, महाबळेश्वर आता वेगळ्या कारणांनी चर्चेत येऊ लागलंय.
विकास भोसले, झी मिडिया, सातारा : महाबळेश्वर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. मात्र, महाबळेश्वर आता वेगळ्या कारणांनी चर्चेत येऊ लागलंय.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
स्वच्छतेचे धडे आता येथील भिंती देऊ लागल्यात. पाहूयात स्वच्छतेसाठी काय सांगतायेत महाबळेश्वरच्या भिंती.
आये हो देखने शहर हमारा दूरही रखना कचरा तुम्हारा.. सफाई को अपनान है महाबळेश्वर स्वच्छ बनाना है या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश महाराष्ट्राचं मिनी असलेल्या महाबळेश्वरच्या भिंती-भिंतीवरून दिला जातोय. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भिंतीवर विविध प्रकारे रंगरंगोटी, स्वच्छता संदेश आणि चित्रांद्वारे स्वच्छतेबरोबरचं पर्यावरण जनजागृती करण्यात आलीये.
देशात स्वच्छतेसाठी अव्वल स्थान पटकवण्यासाठी महाबळेश्वर नगरपरिषदेनं कंबर कसलीय. मुख्य बाजारपेठ दिवसातून पाच वेळा स्वच्छ केली जातेय. देशभारतून येणाऱ्या लाखो पर्यटकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केलं जातयं. प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या या मोहिमेचं पर्यटकांनी स्वागत केलंय.
दरवर्षी १५ ते १६ लाख पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. हजारो टन कचरा इथं जमा होतो. त्यामुळे स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
पण, आता स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून नागरिक, व्यापारी आणि पर्यटक यांच्या जागरुकता निर्माण झालीय. मात्र, पर्यटन स्थळांची स्वच्छता केवळ या स्पर्धेपुरती न राहता कायमस्वरुपी राहण्याची गरज आहे.
महाबळेश्वर | शहरातल्या भिंतींवरुन स्वच्छेतेचा संदेश