यवतमाळ : कॉपीमुक्त वातावरणात दहावीच्या परीक्षा होत असल्याचा दावा शिक्षण विभाग करत असलं, तरी यवतमाळच्या पुसद तालुक्यातील चिखली कॅम्पमधल्या श्री वसंतराव नाईक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा या परीक्षाकेंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा बघायला मिळत आहे. 


परीक्षार्थ्यांना कॉपी पुरविण्यासाठी मोठी गर्दी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूमितीच्या पेपर साठी या केंद्रावर परीक्षार्थ्यांना कॉपी पुरविण्यासाठी मोठी गर्दी, त्यांचा गोंगाट आणि गोंधळ पहायला मिळाला. परीक्षार्थ्यांच्या हातात पेपर पडल्यानंतर अवघ्या १५ मिनिटातच पेपर बाहेर पडला आणि कॉपी पुरविणा-यांची लगबग या केंद्रावर सुरु झाली. 


हे कॉपीबहाद्दर पोलिसांनाही जुमानत नाहीत


हे कॉपीबहाद्दर पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दिसून आले. तसंच शिक्षण विभाग मात्र परीक्षा शांत आणि कॉपीमुक्त वातावरणात होत असल्याचा दावा करत आहे. या गोंगाटामुळे अभ्यास करून पेपर सोडविण्यासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.