Petrol Diesel Rate In Maharashtra : मे महिना संपत आला असला तरी वर्षभरापूर्वी मे 2022 मध्ये तेलाच्या किमतीत सर्वात मोठी वाढ झाली होती. तेल कंपन्यांनी 25 मे रोजी सकाळी 6 वाजता तेलाच्या किमती जाहीर केल्या आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांच्या ताज्या आकडेवारीनुसार देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही स्थिर आहेत. मात्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल स्वस्त मिळत आहे काही ठिकाणी महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात पेट्रोलची (Maharashtra Petrol Rate) सरासरी 106.97 रुपये दराने खरेदी-विक्री होत आहे. काल, 24 मे 2023 ला महाराष्ट्रातील किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सरासरी 106.97 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाले, या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. तर डिझेलची सरासरी 93.60 रुपये दराने विक्री होत आहे. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी सरासरी 93.60 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाल्या, महिन्यात कोणताही बदल झाला नाही. दरम्यान नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.  


शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  105.96 92.49
अकोला  106.14 92.69
अमरावती  107.19 93.70
औरंगाबाद  108.00 95.96
भंडारा  107.01 93.53
बीड  107.90 94.37
बुलढाणा  106.82 93.34
चंद्रपूर  106.17 92.73
धुळे  106.08 92.61
गडचिरोली  107.26 93.78
गोंदिया  107.56  94.05
बृहन्मुंबई  106.42 94.38
हिंगोली  107.06 93.58
जळगाव  107.64 94.11
जालना  107.84 94.29
कोल्हापूर  106.56 93.09
लातूर  107.38 93.87
मुंबई शहर  106.31 94.27
नागपूर  106.04 92.59
नांदेड  107.89 94.38 
नंदुरबार  107.09 93.58
नाशिक  106.76 93.84
उस्मानाबाद  107.35 93.84
पालघर  106.62 93.09
परभणी  109.47 95.86
पुणे  106.17 92.68
रायगड  105.89 92.39
रत्नागिरी  107.43 93.87
सांगली  106.51 93.05
सातारा  107.18 93.48
सिंधुदुर्ग  108.01 94.48
सोलापूर  106.20  92.74
ठाणे  106.01 92.50
वर्धा  106.58 93.11
वाशिम  106.95 93.47
यवतमाळ  107.80 94.29

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर


देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दिल्लीत मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांच्यापेक्षा कमी आहे. दिल्ली एनसीआरमध्ये तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात बदलतात. नोएडामध्ये पेट्रोलची किंमत 96.79 रुपये आणि गुरुग्राममध्ये 97.18 रुपये प्रति लिटर आहे. तर नोएडामध्ये डिझेल 89.96 रुपये प्रति लीटर आणि गुरुग्राममध्ये 90.05 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.  तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. पाटण्यात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. बिहारच्या राजधानीत पेट्रोलचा दर 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.04 रुपये प्रति लिटर आहे. भारतातील स्वच्छ आणि हरित शहर चंदीगडमध्ये पेट्रोलची किंमत 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे.