Petrol Diesel Price on 28 May 2023 : आज रविवारी (28 मे 2023) सुट्टीच्यानिमित्ताने अनेकजण बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असतात. तसेच रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने अनेकजण स्वत:च्या खासगी गाडीने प्रवास करण्याला पसंती देतात. जर तुम्हीपण आज बाहेर पडणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या... कारण देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. तुमच्या शहरात आज इंधनाची किंमत किती आहे? जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. WTI क्रूड प्रति बॅरल $72.67 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 76.95 वर विकले जात आहे. तर महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी 107.01 रुपये दराने विक्री होत आहे. काल, 27 मे 2023 पासून महाराष्ट्रातील किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सरासरी 107.01 रुपये प्रति लिटर या दराने बंद झाले, या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. तर डिझेलची खरेदी सरासरी 93.59 रुपये दराने होत आहे. 


तर गुजरातमध्ये पेट्रोल 55 पैशांनी तर डिझेल 56 पैशांनी महागलं आहे. हिमाचलमध्ये पेट्रोलच्या दरात 68 पैशांनी तर डिझेलच्या दरात 60 पैशांनी वाढ झाली आहे. याशिवाय झारखंड, कर्नाटक, केरळ आणि पंजाबमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 23 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी स्वस्त झाले आहे. मध्य प्रदेशातही पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी कमी झाले आहे. याशिवाय ओडिशातही इंधनाचे दर घसरले आहेत. 


शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  105.99 92.53
अकोला  106.20 92.75
अमरावती  107.19 93.70
औरंगाबाद  107.62 94.08
भंडारा  107.17 93.68
बीड  107.46 94.76
बुलढाणा  107.12 93.56
चंद्रपूर  106.12 93.48
धुळे  106.41 93.11
गडचिरोली  106.92 94.01
गोंदिया  107.47 94.13
बृहन्मुंबई  106.31 94.27
हिंगोली  107.43 93.93
जळगाव  106.33 94.99
जालना  108.84 94.30
कोल्हापूर  107.58 93.11
लातूर  107.27 93.76
मुंबई शहर  106.70 94.27
नागपूर  106.70 93.14
नांदेड  108.32 95.08 
नंदुरबार  107.51 93.99
नाशिक  106.89 92.76
उस्मानाबाद  106.89 93.45
पालघर  106.06 93.55
परभणी  108.76 95.20
पुणे  106.72 92.43
रायगड  106.56 92.39
रत्नागिरी  108.01 94.49
सांगली  106.49 93.02
सातारा  106.74 93.23
सिंधुदुर्ग  107.83 94.25
सोलापूर  106.78 93.30
ठाणे  105.97 92.46
वर्धा  106.54 93.07
वाशिम  107.06 93.58
यवतमाळ  107.25 93.76

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर


दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर