Petrol Diesel Price Today: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
Today Petrol Diesel Price in Marathi : तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण महाराष्ट्रातील काही राज्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Petrol Diesel Price Today in Maharashtra: गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकार भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो. तुम्ही जर आज गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर नक्की तपासा. कारण आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठे बदल झाले आहेत.
आज संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोलची विक्री सरासरी 106.85 रुपयांनी होत आहे. तर डिझेल 93.33 रुपयांनी विकले जाणार आहे. गेल्या महिन्यात 31 मे 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती सरासरी 106.88 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाल्या, या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू झाली असून पेट्रोल-डिझेलचे दर आणि कच्च्या तेलाच्या किमती मूलभूत आहेत. गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे.
दरम्याम मंगळवारी ब्रेंट क्रूड $80 वर ट्रेडिंग केले असते. यापूर्वी, कच्च्या तेलाचा व्यवहार $100 पेक्षा जास्त होता. रविवारपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, नेहमीप्रमाणे आज इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबई ते दिल्ली पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखेच आहेत. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर...
महाराष्ट्रात पेट्रोल 106.85 रुपये आणि डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर
ठाण्यात पेट्रोल रुपये 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोल 105.85 रुपये आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.00 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी नवीन दर जाहीर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
घरबसल्या चेक करा पेट्रोल-डिझेलचे नवे दर
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.