Petrol Price Today: महाराष्ट्रातील `या` जिल्ह्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol-Diesel Price : एप्रिल 2022 पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. देशातील बहुतांश भागात पेट्रोल 100 रुपये तर डिझेल 90 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल महागल्याचे दिसून येत आहे.
Petrol Diesel Price on 12 June 2023 : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) दरात चढ-उतार होत आहे. तर 31 मे 2023 रोजी महाराष्ट्रात डिझेलच्या किंमती 0.12 टक्क्यांनी वाढून सरासरी 93.48 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाल्या आहेत. आज (12 जून 2023 ) महाराष्ट्रात पेट्रोल 107.03 रुपयांनी विक्री होत आहे.तर डिझेलची 93.65 रुपये दराने विक्री होत आहे. परिणामी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल महागले तर काही जिल्ह्यात स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर...
दरम्यान 2024 मध्ये लोकसभेची निवडणूकही आहे.अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यास सरकारसह जनतेलाही मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई, पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत.त्यातच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याचे संकते दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास लवकरच स्वस्त पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत जनतेला दिलासा मिळू शकेल.या कंपन्यांनी पुढील तिमाहीत चांगली कामगिरी केली तर ते किंमतीतील कपातीवर निर्णय घेण्यास सक्षम असतील.
महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- अहमदनगर पेट्रोल 105.96 आणि डिझेल 92.49 रुपये प्रतिलिटर
- अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये तर डिझेल 92.72 रुपये प्रतिलिटर
- अमरावती पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रतिलिटर
- औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
- जळगावात पेट्रोल 106.89 रुपये तर डिझेल 93.38 रुपये प्रतिलिटर
- कोल्हापुरात पेट्रोल 106.26 रुपये आणि डिझेल 92.80 रुपये प्रतिलिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 107.19 रुपये आणि डिझेल 93.96 रुपये प्रतिलिटर
- नागपुरात पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रतिलिटर
- नांदेडमध्ये पेट्रोल 108.18 रुपये आणि डिझेल 94.65 रुपये प्रतिलिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.06 रुपये प्रतिलिटर
- परभणी पेट्रोल 109.47 रुपये तर डिझेल 95.86 रुपये प्रतिलिटर
- पुण्यात पेट्रोल 105.84 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
- रायगड पेट्रोल 105.11 आणि डिझेल 93.57 रुपये प्रति लिटर
- सोलापुरात पेट्रोलचा 106.77 रुपये तर डिझेलचा दर 93.29 रुपये प्रतिलिटर
- ठाण्यात पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रतिलिटर
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.