Today Petrol Diesel Price on 18 June 2023 : रविवारी बाहेर फिरायला निघण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या आजचे दर (Petrol Diesel Price) जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरलेल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून कच्चा तेलाचे दर आटोक्यात आहे. आज कच्च्या तेलाची (crude oil) किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या वर कायम आहे. ब्रेंट क्रूड $0.94 किंवा 1.24 टक्क्यांनी वाढून $76.61 प्रति बॅरल आणि WTI क्रूड $1.16, किंवा 1.64 टक्क्यांनी वाढून $71.78 प्रति बॅरल झाले. दरम्यान तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरत दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात पेट्रोलचे दर 106.87 रुपये (maharashtra petrol rate) असून डिझेल 93.68 रुपयांनी विकले जाणार आहे. तुम्ही पेट्रोल डिझेलचे दर एसएमएसद्वारे सहज जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या ग्राहकांना RSP लिहून 9224992249 वर या नंबर नवीन दर मिळतील. तर BPCL चे ग्राहक त्यांच्या मोबाईलच्या किमती घरबसल्या जाणून घेऊ शकतात. यासाठी मोबाईल मेसेजमध्ये आरएसपी लिहून 9223112222 या नंबरवर हा मेसेज पाठवला. त्यानंतर कंपनी तुम्हाला आज एसएमएसद्वारे अपडेट दर देईल. HPCL ग्राहकांना 9222201122 किंवा नंबरवर HPPprice म्हणून एसएमएस पाठवावा लागेल. 


महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर


शहर             पेट्रोलचे दर (रु.)  डिझेलचे दर (रु )
अहमदनगर  106.36  93.09
अकोला  106.64  92.91
अमरावती  106.86 93.94 
औरंगाबाद  107.75  95.96
भंडारा 107.11 93.53 
बीड  106.84  94.34
बुलढाणा 106.44 93.34 
चंद्रपूर 106.54 92.68 
धुळे 105.94 92.66 
गडचिरोली 107.26 93.78 
गोंदिया 107.85 94.05 
बृहन्मुंबई 106.31 94.27 
हिंगोली 107.06  93.58 
जळगाव 106.43 92.94  
जालना  107.74  94.28 
कोल्हापूर  106.35  93.94
लातूर 107.92  93.74 
मुंबई शहर  106.31  94.27
नागपूर 106.03 92.59 
नांदेड 108.03 94.38 
नंदुरबार  107.22  93.71
नाशिक  106.76  93.19
उस्मानाबाद  106.92 93.43 
पालघर  106.25  92.87
परभणी  109.01  95.86
पुणे  106.01   93.11
रायगड  105.89  93.57
रत्नागिरी 107.48 94.11 
सांगली  106.49  92.60 
सातारा  106.33  93.28
सिंधुदुर्ग  107.97  94.45
सोलापूर  106.32  93.29
ठाणे 106.45 94.34 
वर्धा 106.94   93.06
वाशिम  106.95  93.47

गेल्या सहा महिन्यांत मोदी सरकारने 22 मे 2022 पासून देशात इंधनाचे दर वाढू दिले नाहीत. पण जनतेला याचा फारसा दिलासा मिळाला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त झाल्यातर जनतेला हा मोठा दिलासा असेल, या निर्णयामुळे महागाई आटोक्यात आणण्याच्या रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल.