Petrol Diesel Price on 2 June 2023 :  गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत असून आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जवळपास किमती खाली आल्या आहेत. डब्ल्यूटीआय कच्चे तेल 0.17 टक्क्यांनी घसरले आणि प्रति बॅरल $70.19 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड तेल 0.12% वाढून प्रति बॅरल $74.45 वर व्यापार करत आहे. दरम्यान देशातील सर्व शहरांमध्ये आज, (2 जून) पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 'जैसे थे' आहेत. इतर काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नोंदवण्यात आला आहे. कोणत्या शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत आणि कुठे ते जाणून घ्या...


महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर 


शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  106.36 92.73
अकोला  106.14 92.69
अमरावती  107.57 93.65
औरंगाबाद  108.40 93.96
भंडारा  107.11 93.53
बीड  106.97 93.09
बुलढाणा  106.65 93.18 
चंद्रपूर  106.17 92.97
धुळे  106.94 92.48
गडचिरोली  107.03 93.55
गोंदिया  107.85 94.33
बृहन्मुंबई  106.31 94.27
हिंगोली  107.43 93.93
जळगाव  106.43 92.95
जालना  107.84 94.29
कोल्हापूर  106.51 93.05
लातूर  107.45 93.69
मुंबई शहर  106.31 94.27
नागपूर  106.63 93.16
नांदेड  108.37 94.85
नंदुरबार  107.99 93.49
नाशिक  106.56 93.07
उस्मानाबाद  107.35 93.84
पालघर  106.25 92.55
परभणी  108.79 95.21
पुणे  106.79 92.30
रायगड  105.48 92.30
रत्नागिरी  107.48 93.87
सांगली  106.83 92.95
सातारा  106.09 93.22
सिंधुदुर्ग  108.83 94.48
सोलापूर  106.20 93.74
ठाणे  106.01 92.50
वर्धा  106.58 93.11
वाशिम  106.95 93.47
यवतमाळ  107.80 94.29

सरकारच्या तिजोरीत भर


2 जून रोजी एखाद्या शहरात पेट्रोलची किंमत 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट आहेत. या रकमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोल डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. तर वाहतुकीसाठी 0.20 पैसे मोजावे लागतात. 


असे जाणून घ्या नवे दर 


जर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्यायच्या असतील  तुम्ही तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा एसएमएस पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत तपासू शकता. सरकारी तेल विपणन कंपन्यांचे इंडियन ऑईल ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 वर टाईप करून किंवा नंबरवर एसएमएस पाठवून इंधनाची किंमत तपासू शकतात. तसेच HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहक <डीलर कोड> म्हणून 9223112222 वर एसएमएस पाठवू शकतात.