Petrol Diesel Price on 31 May 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतींवर (crude oil prices) पेट्रोल आणि डिझेलचा भाव ठरतात. भारतात गेल्यावर्षी मे 2022 महिन्याच्या अखेरीस भावात शेवटचा मोठा बदल झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात राज्य सरकारच्या कर धोरणाव्यतिरिक्त कुठेच इंधनाच्या भावात मोठा बदल झालेला नाही. प्रत्येक शहरातील पेट्रोल-डिझेलच्या दरात तफावत दिसून येते. कच्चा तेलाच्या दरानुसार आज, 31 मे 2023 आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या किमती 4.58 टक्क्यांनी घसरून 73.54 डॉलर प्रति बॅरलवर आल्या. याशिवाय, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे आणि ती प्रति बॅरल $ 69.48 वर व्यापार करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) चढ-उतार होत असतात. आजही (31 मे 2023) पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. एका वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत आणि कमीही झालेले नाहीत. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करतात. या आधारे राज्य कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर, देशाच्या विविध भागातील पंपधारकांचे कमिशन या दरातील तफावत दिसून येते. या आधारे देशातील विविध शहरांमध्ये इंधनाच्या किमतीत तफावत आहे.


शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  106.53 93.03
अकोला  106.14 92.69
अमरावती  107.23 93.74
औरंगाबाद  106.75 93.24
भंडारा  106.69 93.22
बीड  107.46 93.94
बुलढाणा  108.11 94.55 
चंद्रपूर  106.39 92.94
धुळे  106.01 92.54
गडचिरोली  106.82 93.36
गोंदिया  107.84 94.32
बृहन्मुंबई  106.31 94.27
हिंगोली  107.93 94.41
जळगाव  106.17 92.70
जालना  108.30 94.73
कोल्हापूर  106.47 93.01
लातूर  107.19 93.69
मुंबई शहर  106.31 94.27
नागपूर  106.04 92.59
नांदेड  108.32 94.78
नंदुरबार  106.99 93.49
नाशिक  105.89 92.42
उस्मानाबाद  107.35 93.84
पालघर  106.06 92.55
परभणी  108.79 95.21
पुणे  105.77 92.30
रायगड  105.80 92.30
रत्नागिरी  107.43 93.87
सांगली  106.41 92.95
सातारा  106.73 93.22
सिंधुदुर्ग  108.25 94.72
सोलापूर  106.49 93.01
ठाणे  105.97 92.47
वर्धा  106.18 93.52
वाशिम  107.07 93.59
यवतमाळ  107.29 93.80

क्रूडचे दर 130 वरून 73 वर आले असले तरीही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. यामध्ये तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे जात आहे. तर, ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेलचा दरही 100 रुपयांच्या वर आहे.


  • महाराष्ट्रात पेट्रोल 106.31 रुपये, तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 

  • बिहारच्या पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये 

  • इंदूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.66 रुपये आणि डिझेलची किंमत 93.94 रुपये 

  • जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.48 रुपये आणि डिझेलची किंमत 93.72 रुपये