Petrol-Diesel Price on 21 June 2023 : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) भारतीय तेल कंपन्यांकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आज (21 जून 2023 ) देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) ऐतिहासिक पातळीवर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती  शंभरी पार आहेत. परिणामी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. जर तुम्ही आज गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरायसा जाणार असाल तर जाणून घ्या आजचे दर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर (Petrol-Diesel Price) कोणताही परिणाम होताना दिसत नाही. मात्र, आज काही शहरांमध्ये कर आणि इतर कारणांमुळे तेल स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.26 टक्क्यांनी घसरून 75.70 डॉलर प्रति बॅरलवर आले. याशिवाय डब्ल्यूटीआय क्रूड आज 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल 70.50 डॉलरच्या दराने व्यवहार करत आहे. 


तर महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलच्या (Maharashtra Petrol Price) दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या  किमती शंभरी पारवर पोहोचल्या आहेत. IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत (मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलची किंमत) 106.31 रुपये प्रति लिटर आहे. डिझेलची किंमत 94.27रुपये प्रति लिटर आहे. महाराष्ट्रातच पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पेट्रोल-डिझेलचा दर प्रतिलिटर 106.07 रुपये आहे. डिझेलची किंमत 92.58 रुपये प्रति लिटर आहे. 


राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :


मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर  तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


ठाण्यात पेट्रोल 106.45 रुपये प्रति लिटर  तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर   


पुणे  पेट्रोल 106.07 रुपये प्रति लिटर  तर डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर


नाशिक पेट्रोल 106.26 रुपये प्रति लिटर  तर डिझेल 92.78 रुपये प्रति लिटर


नागपूर पेट्रोल 106.21 रुपये प्रति लिटर  तर डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर


कोल्हापूर पेट्रोल 106.51 रुपये प्रति लिटर  तर डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर


अहमदनगर पेट्रोल 106.62 रुपये प्रति लिटर  तर डिझेल 93.13  रुपये प्रति लिटर


अमरावती पेट्रोल 106.81 रुपये प्रति लिटर  तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर