Petrol Diesel Price Today: सरकारकडून पुन्हा कच्चा तेलावर करवाढ; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग?
Petrol Diesel Price Today on 1st March: भारत सरकारने आज म्हणजेच 1 मार्चला कच्च्या तेलावरील (Crude Oil) विंडफॉल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.परिणामी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती महागल्या कि स्वस्त झाल्या आहेत?जाणून घ्या सविस्तर बातमी...
Petrol Diesel Price Today In Marathi : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी, सकाळी 6 वाजता ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 82.30 डॉलरवर विकले जाणार आहे. दरम्यान, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती. मात्र अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नाही. त्यातच आज (1 मार्च) सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर विंडफॉल गेन टॅक्स वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताने प्रथम 1 जुलै 2022 रोजी विंडफॉल गेन टॅक्स लागू केला. दर 15 दिवसांनी या कराचे पुनरावलोकन केले जाते. गेल्या दोन आठवड्यांच्या सरासरी तेलाच्या किमतींच्या आधारे हा आढावा घेण्यात आला आहे.
मागील महिन्याच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार झाला आहे. आज, WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.54 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.07 वर व्यापार होत आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर, ब्रेंट क्रूड ऑइलचे भाव, अमेरिकन डॉलर, इंधन टंचाईची समस्या निर्माण करणारी भौगोलिक राजकीय परिस्थिती. त्यामुळे देशातील परिस्थिती बदलते.एकतर उत्पादन शुल्क किंवा राज्य कर या मागणीत बदल इत्यादींचा परिणाम पेट्रोलच्या किमतीवर होतो.
विंडफॉल टॅक्स म्हणजे काय?
केंद्र सरकार विशेष परिस्थितीत उद्योगावर सामान्य करापेक्षा जास्त कर लादते. अशा कराला विंडफॉल कर म्हणतात. हा कर एकवेळ आकारला जातो. ज्या कंपन्या किंवा उद्योग विशेष परिस्थितीमुळे नफा कमावत आहेत त्यांच्याकडून हा कर भरला जातो.
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
पुण्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.07 रुपये तर डिझेलचा दर 92.58 रुपये प्रतिलिटर आहे.
नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 92.58 रुपये प्रतिलिटर आहे.
नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.59 रुपये प्रतिलिटर आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.75 रुपये दराने विकले जाते. डिझेल 95.45 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.