Petrol Diesel Price Today in Mahararashtra: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत बदलत आहे. आज (14 मार्च) सकाळीही इंधनाच्या दरात बदल झाला आहे. गुरुवारी डब्ल्यूटीआय क्रूड 0.21% वाढून $79.88 प्रति बॅरल होते. तर ब्रेंट क्रूड 0.21% वाढून $84.20 प्रति बॅरलवर पोहोचले. त्यातच कच्च्या तेलाच्या किमतीवरून इंधनाचे दर ठरवले जातात.  जाहिर झालेल्या या किंमतीमध्ये गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेल 9 रुपयांनी महाग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान गुजरातमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आणि राज्यातील इंधन दर यामध्ये मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 96.81 रुपयांनी विकेले जाते तर  डिझेल 92.57 रुपयांनी विकले जाते. तेच महाराष्ट्रात पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये आहे. एकंदरीत गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल 1.7 रुपयांनी महाग आहे. आज (14 मार्च) महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 42 पैशांनी तर डिझेलच्या दरात 40 पैशांनी घट झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 17 पैशांनी घट झाली आहे. छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले जात आहेत.


महाराष्ट्रातील इतर शहरांमधील दर


मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.


पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.38 रुपये तर डिझेलचा दर 92.89 रुपये प्रतिलिटर आहे.


नाशिकमध्ये पेट्रोल 106.57 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.07 रुपये प्रतिलिटर आहे.


नागपुरात पेट्रोलचा दर 106.06 रुपये तर डिझेलचा दर 92.61 रुपये प्रतिलिटर आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.75 रुपये तर डिझेल 95.45 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते.


दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे.


असं जाणून घ्या नवे दर 


पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर आरएसपी आणि त्यांचा शहर कोड टाइप करून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून नवीनतम दर जाणून घेऊ शकतात.