निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेल `इतक्या` रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर
Petrol Diesel Price : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज 18 व्या लोकसभा निवडणूकीची घोषणा केली असून निवडणुकीपूर्वीच सर्वसामान्य जनेताला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Petrol Diesel Price Today in Marathi : लोकसभा निवडणुकीच्या तारखी ठरली असून 19 एप्रिलपासून मतदानाचा पहिला टप्पा सुरू केला असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. याचदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांची घसरण झाली असून ही घसरण आणखीन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात सातत्याने होणारी घट देशाला दिलासा देणारी ठरली आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन-दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. याचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल. दरम्यान डिझेलवर चालणारी 58 लाख अवजड वाहने, 6 कोटी कार आणि 27 कोटी दुचारी वाहनांना खर्च कमी होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने अनेक फायदे होणार आहेत. यामुळे लोकांच्या खर्चावर नियंत्रण राहण्यास मदत होईल.
तसेच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्यानंतर पर्यटन आणि प्रवास उद्योगाला चालना मिळेल. महागाई आटोक्यात आणण्याल मदत होईल. वाहतुकीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांच्या खर्चात कपात होईल. शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि पंप संच यावर कमी खर्च येईल. पण केवळ 2 रुपयांची कपात केल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
आज मुंबईत पेट्रोल 104.21 रुपयांनी प्रतिलीटरने विकले जाणार आहे. तर डिझेल 92.15 रुपयांनी विकले जाईल. ठाण्यात पेट्रोल 104.33 रुपये तर डिझेल 90.88 रुपये, पुण्यात पेट्रोल 103.93 तर डिझेल 90.46 रुपये, नागपूरमध्ये पेट्रोल 104.31 रुपये तर डिझेल 90.86 रुपयांनी विकले जाईल. तसेच नाशिकमध्ये 103.80 रुपये तर डिझेल 90.34 रुपयांनी विकले जाणार आहे.
देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. मात्र, 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आलेला नव्हता. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. त्यानुसार तुम्ही घरबसल्या पेट्रोल डिझेलचे नवे दर तपासू शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटवर जावे लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर तुम्ही RSP सोबत 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता आणि तुम्ही BPCL ग्राहक असाल तर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता