Petrol-Diesel Price Today In Marathi: भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. 22 मार्च 2022 पासून सरकारी पेट्रोल कंपन्यांनी इंधनाच्या दरात 15 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अद्याप पेट्रोलचे दर 100 च्या खाली उतरले नाही. तर महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात अजूनही पेट्रोलने प्रतिलिटर 107.39 रुपये इतका उच्चांकाने विकले जात आहे. तर दुसरीकडे शेजारचे देश असणारे म्हणजे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त दरात विकले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पाकिस्तानात प्रत्येक गोष्टीचा दुष्काळ आहे. यामध्ये रुग्णांना आवश्यक औषधे मिळत नाहीत. देशाची तिजोरी रिकामी आहे.  असे असताना पाकिस्तान सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून सरकार अधिक महागाई निर्माण करत आहे. पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 293.94  रुपये आणि डिझेलची किंमत 260 रुपये प्रति लिटर आहे. तर तेच भारतात एक लिटर पेट्रोल 104.21 रुपयांनी विकले जात आहे तर डिझेल 92.15  रुपयांनी विकले जात आहे. 


...तरीही भारतात इतकं महाग कसं?


पाकिस्तानात एक लीटर पेट्रोल PKR 293.94 ने विकले जात आहे. तर डिझेलची किंमत 260 रुपये प्रति लिटर आहे.  म्हणजे पाकिस्तानमध्ये 1 डॉलरची किंमत भारतात 0.30 रुपये आहे. त्यानुसार पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर बघायला गेलो तर, आज (16 एप्रिल 2024 ) पाकिस्तानात PKR 293.94 म्हणजे भारतातील 87.91 रुपयांनी पेट्रोल विकले जात आहे. तर डिझेल PKR 282.24 रुपयांनुसार  भारतात त्याची किंमत 84.39 रुपये आहे. तेच  भारतात प्रति लिटर पेट्रोलची किंमत 108.16 रुपये आणि डिझेल 96.57 रुपयांनी विकले जात आहे. 


हे सुद्धा वाचा: 3 वर्षात सोन्याच्या दरात 27,813 रुपयांची वाढ, चांदी 18,307 रुपयांनी वधारली


महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर


मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे. त्याचबरोबर पुण्यात पेट्रोल 103.93 रुपये तर डिझेल 90.46 रुपये प्रति लिटर, ठाण्यात पेट्रोल 103.89 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.40 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 104.69 रुपये प्रति लिटर तर डिझेल 91.20 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 103.96 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.52 रुपये प्रति लिटर, छत्रपती संभाजी नगर पेट्रोल 105.10 रुपये प्रति लिटर तर डिझेल 91.60 रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे.