Petrol Diesel Price :  आज रविवार. अनेकांसाठीच सुट्टीचा दिवस. हा सुट्टीचा दिवस घरात बसण्यापेक्षा कुठंतरी भटकंतीसाठी जाण्याचा विचार तुमच्यापैकी अनेकजण करत असतील. काहींनी तर ती वाटही धरली असेल. या साऱ्यामध्ये तुम्ही वाहनाचा Tank Full करायला विसरु नका बरं. कारण, खाद्यच नसेल नसेल तर ते वाहन कसं बरं तुमची साथ देईल? हो, पण त्याआधी आजच्या दिवसभरात तुम्हाला इंधनासाठी नेमके किती रुपये मोजावे लागणार आहेत याचीही कल्पना असूद्या. कारण, काही भागांमध्ये हे दर वाढले आहेत तर, काही भागांमध्ये स्थिर किंवा वाढलेलेच नाहीत. (Petrol Diesel Price todays latest rates know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर दिवसाप्रमाणं आजही देशातील महत्त्वाच्या सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलच्या दरांबाबतची माहिती देण्यात आली आहे. 16 एप्रिल (रविवार) या दिवशी देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पण, चार महानगरांमध्ये मात्र हे दर स्थिर आहेत.  दर वाढलेल्या शहरांमध्ये अहमदाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि लखनऊचा समावेश आहे.


महानगरांविषयी सांगावं तर, इथं इंधनाचे दर खालीलप्रमाणे...


दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये, डीझेल 89.62 रुपये प्रती लीटर


चेन्नई - पेट्रोल 102.73 रुपये, डिझेल 94.33 रुपये प्रती लीटर


कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रती लीटर


मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रती लीटर


महाराष्ट्रात इंधनांच्या दरांसाठी किती किंमत मोजावी लागणार?


अहमदनगर - पेट्रोल 106.53 रुपये, डिझेल 93.03 रुपये प्रती लीटर


बीड- पेट्रोल 107.46 रुपये, डिझेल 93.94 रुपये प्रती लीटर


चंद्रपूर- पेट्रोल 106.39 रुपये, डिझेल 92.94 रुपये प्रती लीटर


कोल्हापूर - पेट्रोल 106.47 रुपये, डिझेल 93.01 रुपये प्रती लीटर


नागपूर - पेट्रोल 106.04 रुपये, डिझेल 92.59 रुपये प्रती लीटर


नाशिक- पेट्रोल 105.89 रुपये, डिझेल 92.42 रुपये प्रती लीटर


पुणे - पेट्रोल 105.77 रुपये, डिझेल 92.30 रुपये प्रती लीटर


कच्च्या तेलाच्या दरात वाढ


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या दरांत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच तेल उत्पादन करणाऱ्या राष्ट्रांनी मात्र मे महिन्यापासून तेलाच्या उत्पादनातच कपातीचा निर्णय घेतल्यामुळं कच्च्या तेलाची दरवाढ सातत्यानं सुरु असल्याचं पाहायला मिळणार आहे.


हेसुद्धा वाचा : 7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी पगारवाढीची बातमी; DA मध्ये वाढ


घरच्या घरी पाहून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर...


तुम्हाला माहितीये का, तुम्ही घरबसल्या इंधनाचे दर पाहू शकता. यासाठी हातातकला मोबाईल तुम्हाला मोठी मदत करणार आहे. तुम्ही इतकंच करायचंय, इंधनाचे हे दर जाणून घेण्यासाठी एचपीसीएल  (HPCL) च्या ग्राहकांनी  HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवा. बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP<डीलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवा. तुम्ही इंडियन ऑईलचे ग्राहक असाल, तर RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवा. पुढच्या काही मिनिटांत तुम्हाला तुमच्या शहारतील इंधनाचे दर सहजपणे समजतील.