मुंबई : पेट्रोल-डिझेलवरचा स्टेट स्पेसिफीक सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यानं घेतला आहे. यामुळे राज्यातील पेट्रोलचे दर ६७ पैसे ते १ रुपया ७७ पैसे इतके तर डिझेलचे दर १रुपये २५ पैसे ते १ रुपये ६६ पैसे इतके स्वस्त झाले आहेत. अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात वस्तू व सेवा कर रद्द झाल्यामुळे त्याचा इंधनावर पेट्रोलियम कंपन्यांनी लावलेला स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द करावी, अशी मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली होती.


महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत तेल कंपन्यांचे दोन रिफायनरी आहेत. या रिफायनरीमध्ये आयात होणाऱ्या कच्चे तेलावर मुंबई महानगरपालिका जकात वसूल करत होती. ही जकातीची रक्कम वार्षिक सुमारे ३००० कोटी होती व त्याच्या वसुली पोटी महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या पेट्रोल, डिझेल व इतर पेट्रोलियम पदार्थांवर तेल कंपन्या स्टेट स्पेसिफीक सरचार्ज लावत होत्या.


जीएसटी मंजूर झाल्यानंतर मुंबईतील कच्च्या तेलावरील जकातही मुंबई महानगरपालिकेने थांबविला. पण हा विशेष सरचार्ज रद्द न करता तेल कंपन्या महाराष्ट्रात त्याची वसुली करत होत्या. याबाबत फामपेडा’या संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षण खात्याकडे ३ जुलै रोजी केली होती.