सोसायटीत सापडले PFI जिंदाबाद लिहिलेले स्टिकर्स आणि सुतळी बॉम्ब; पनवेलमध्ये खळबळ
पनवेलमध्ये पीएफआय जिंदाबाद लिहिलेले स्टिकर्स आणि सुतळी बॉम्ब आढळले आहेत. खांदेश्वर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Panvel PFI : PFI चं पनवेल कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाल आहे. पीएफआय जिंदाबाद असे मेसेज लिहिलेले स्टीकर्स आणि सुतळी बॉम्ब नागरिकांना आढळलेत. त्यामुळे खळबळ माजलीये. रहिवाशांनी ही बाब खांन्देश्वर पोलीसांना सांगितल्या पोलीसांनी पाहणी करुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही नवी मुबई, भिवंडीसह अन्य शहरात छापे मारून PFi संघटनेशी संलग्न असणाऱ्या जवळपास 20 व्यक्तींना ताब्यात घेतलंय. आणि आता हे पनवेल कनेक्शन समोर आले आहे.
786 हा नंबर घरा बाहेर लिहल्याने रहिवाशांमध्ये घबराट
नवीन पनवेल सेक्टर 19 मधील नीलागण सोसायटीच्या आवरात ही घटना घडली आहे. सोसायटीमधील काही फ्लॅटच्या बाहेरील भींतीवर हा मेसेज लिहल्याचे समोर आले आहे. सदर घटना सोसायटी रहिवाशांनी खांन्देश्वर पोलीसांनी सांगितल्या नंतर पोलीसांनी पाहणी करीत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पीएफआय संघटना पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान 786 हा नंबर घरा बाहेर लिहल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
पनवेलमधून पीएफआयच्या 4 सदस्यांना अटक
2022 मध्ये राष्ट्रीय यंत्रणा ( NIA ) ने देशभरासह महाराष्ट्र् राज्यातील पुणे, मालेगाव आणि नवी मुबई , भिवंडी सह अन्य शहरात छापे मारून PFI संघटनेशी संलग्न असणाऱ्या जवळपास 20 व्यक्तींना ताब्यात घेतले होते. कार्यालय देखील सील केले होते. या मध्ये पनवेल मधील काही जणांचा समावेश होता. नविन पनवेल मधील देशभरात पीएफआयवर छापेमारी केल्यानंतर अनेकांना अटक करण्यात आली. पनवेलमधून पीएफआयच्या 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. एटीएसनं ही कारवाई केली होती. अटकेतील एक जण पनवेलमधील पीएफआयचा सचिव आहे.. या सर्वांवर काळाचौकी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
1113 पानी चार्जशीट
या प्रकरणी आता एटीएसने 5 सदस्यांची चौकशी करून 1113 पानी चार्जशीट दाखल केली होती. त्यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. 2047 सालापर्यंत भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा PFI चा प्लान होता, त्यासाठी देशविरोधी कारवाया करण्यासाठी राज्यातील अनेक भागात गुप्त बैठका झाल्याची माहिती समोर आली होती. पीएफआयने चेंबूर, धारावी, कुर्ला, ठाणे, नेरूळ, पनवेल आणि मुंब्रा या ठिकाणी बैठका झाल्याचं तपासात निष्पन्न झाले होते.