विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर :  राज्यात नक्की काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आलीय. राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्याच्या घटना घडत्यात. त्यात आता संभाजीनगरमध्ये एक धक्कादाय प्रकार घडलाय, ज्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरलाय. तरुणाने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:लाही जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान या दोघांवर उपचार सुरु आहेत. (phd student of government science institute sambhaji nagar burnt himself and hugged a girl crime news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तरुण-तरुणी शहरातील शासकीय विज्ञान संस्थेत मध्ये पी एच डी करत होते. या दोघांमध्ये गेल्या दीड ते 2 वर्षांपासून ओळख होती. या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध असल्याचं म्हटलं जातंय. तरुणाने या तरुणीला लग्नाबद्दल विचारल्याचंही समजतंय. मात्र तरुणीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याचीही माहिती आहे. तसेच या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. मात्र तरुणीने तरुणाला उधार घेतलेले पैसे परत देण्यास नकार दिला. यावरुन हा प्रकार घडल्याचं समजतंय.


नक्की काय झालं?  


तरुणाने आधी स्वत:ला पेटवून घेतलं. त्यानंतर तरुणीला मिठी मारली. यामुळे तरुण 60 टक्के तर तरुणी 30 टक्के जळाली आहे. या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.