अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलावर शारीरिक अत्याचार
अंबरनाथमधला धक्कादायक प्रकार
अंबरनाथ : घरी सोडण्याच्या बहाण्यानं एका निर्जन स्थळी घेऊन जाऊन एका नराधमानं एका अल्पवयीन मुलावर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. त्यानंतर पीडित मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी रघूचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या घरी जात असताना नराधमानं त्याला घरी सोडण्याच्या बहाण्यानं गाडीवर बसवलं आणि निर्जनस्थळी घेऊन गेला. त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर अत्याचार केले. त्यानंतर घरी परतल्यानंतर घडलेली घटना पीडित मुलानं आपल्या घरच्यांना सांगितली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.