Video : रिक्षावाला बाबा कांबळे झाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, अजित पवारांनी घेतली नोंद
अजित पवार यांच्याकडेही हा फोटो पोहचल्याने त्यांनीही याबाबत विचारणा केली आहे
Pimpri Autorikswa Driver : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीसांचे युतीचे सरकार राज्यात सत्तेत आलं. एकनाथ शिंदेंच्या बंडांवर आघाडीतील नेत्यांसह शिवसेनेतूनही (Shivsena) जोरदार टीका केली. यावेळी त्यांचा उल्लेख रिक्षावाल असा करण्यात आला.
पूर्वी रिक्षाचालक (autorikswa driver) असलेल्या एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकनाथ शिंदेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदे गटाकडून प्रत्युत्तर म्हणून रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी योजना आणणार असल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे यांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना रिक्षा मर्सिडीसपेक्षा पुढे गेली असा टोला लगावला होता.
ठाण्यातील रिक्षाचालकांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे राज्यभरात रिक्षा चालकांची चर्चा सुरु आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज्यातील राजकारण्यापर्यंतही हा फोटो पोहोचला आणि एकच चर्चा सुरु झाली. माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते यांनाही हा फोटो एकनाथ शिंदे असल्याची शंका उपस्थित आणि आणि त्यांनी थेट फोटो व्हायरल झालेल्या व्यक्तीलाच फोन केला.
व्हायरल फोटोमध्ये असलेल्या व्यक्तीचे एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले साधर्म्य आणि दाढीमुळे अनेकांना तो मुख्यमंत्र्यांचा फोटो असल्याचे वाटलं. मात्र आता तो फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसल्याचे समोर आलं आहे.
हा फोटो नेमका कोणाचा आहे हे समोर आल्यानंतर अजित पवार यांनी थेट त्यांनाच फोन करुन शहानिशा करुन घेतली. व्हायरल फोटोमध्ये असलेली व्यक्ती ही पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायत या रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे आहेत.
अजित पवारांनी फोन करत "बाबा, तूच आहेस का रे?" असा प्रश्नही बाबा कांबळे यांना विचारला. त्यानंतर बाबा कांबळे यांनी या व्हायरल फोटोबद्दल माहिती दिली आहे.
सुरुवातीच्या काळात रिक्षाचालक बाबा कांबळे काम करत होते. १९९७ मध्ये श्रावण महिन्यात रिक्षा स्टॅंडवर रिक्षाची पूजा केली होती. त्यावेळी काढलेला फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल झाल्याचे त्यांनी सांगितले.
हा फोटो एकनाथ शिंदे यांचा असल्याचा दावा अनेक जण करत आहे. हा फोटो छगन भुजबळ यांनीही मला पाठवला. यामुळे नक्की काय समजत नव्हतं. नंतर तो तुमचा असल्याचं समजलं. यामुळे तुम्हाला फोन केला, असं म्हणत अजित पवारांनी बाबा कांबळेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या