पिंपरी-चिंचवड: मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला कडक पोलीस बंदोबस्तात सुरूवात झाली. क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे.


कार्यकर्त्यांची धरपकड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही मराठा संघटनांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.. पिंपरीमध्ये दहा ते बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलंय.


शहराला छावनीचे स्वरूप


दरम्यान, कार्यक्रमावेळी कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलिस अलर्ट आहेत. संशायस्पद हालचाल दिसली तर पोलीस लगेच कसून तपास करत आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिसफाटा आल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.