पिंपरी चिंचवड:जन्मदात्या बापानं ४ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटले
पोलिसांनी या क्रूर बापाला ताब्यात घेतलं आहे. तर मुलाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवड: पत्नीने पैसे मागितल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जन्मदात्य बापानेच आपल्या चार महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटले. पिंपरी चिंचवड येथील आंबेडकर नगरात हा प्रकार घडला. दत्ता अनिल देशमुख असं या नराधम बापाचं नाव आहे. पोलिसांनी या बापाला ताब्यात घेतलं आहे. तर मुलाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, पत्नीने पैसे मागितल्याच्या कारणावरून दत्ता देशमुख याने हे कृत्य केले. जखमी मुलावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, दत्ता देशमुखची पत्नी शुभांगी दत्ता देशमुख यांनी पोलीसात तक्रार दाखल केली.