पिंपरी-चिंचवड: प्रत्येक तरुणीचं एक स्वप्न असतं. गगनभरारी घेण्याचं, जिद्द पूर्ण करण्याचं पण आपल्या स्वप्नांना लग्नानंतरही हृदयात जपून साकार करणाऱ्या महिला फार कमी असतात. अशाच एका महिलेची कहाणी आहे. या महिलेनं आपलं घर सांभाळून CAच्या परीक्षा दिल्या. कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अखेर CA होण्यात या महिलेला यश मिळालं आहे. 
 
 लग्न झाल्यानंतर अनेक महिलांना नोकरी करावी की घराकडे लक्ष द्यावं, असा प्रश्न पडतो. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणा-या अरुणांनी घर सांभाळता सांभाळता एक स्वप्न पाहिलं आणि १० वर्षांनी ते पूर्णही करुन दाखवलं. 
एक गृहिणी कशी झाली सीए ?
पिंपळे निलखमध्ये राहणाऱ्या अरुणा कृष्णा कुंभार शिरसे यांनी मनात पक्क केलं. सीए होण्याचं स्वप्न मोठ्या परिश्रमानं साकार करून दाखवलं आहे.  घरात नवरा, मुलं, सासू सासरे, दीर भावजय त्यांची मुलं असं मोठ्ठं कुटुंब आहे. एवढं सगळं कुटुंब सांभाळता सांभाळताही अरुणा यांनी एक स्वप्न पाहिलं सीए होण्याचं. हा प्रवास आणि अभ्यास सोपा नव्हता पण 
अरुणांनी जिद्दीनं हे करुन दाखवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीए होण्यासाठी अरुणा यांना 10 वर्ष प्रयत्न करावे लागले. अर्थात त्यामध्ये काही कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी आल्या. मात्र आपला निश्चय त्यांनी ढळू दिला नाही. पण एकत्र कुटुंब असल्याने त्यांना या अडचणींवर मात करता आली..


बऱ्याचदा लग्नानंतर महिला चूल आणि मूल मध्ये स्वप्नं विसरून जातात.  कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्वप्न पाहता येतात आणि यशस्वी होता येतं, हे अरुणानं दाखवून दिलं आहे. त्यांच्या या जिद्दीचं खूप कौतुक देखील होत आहे.