पिंपरी-चिंचवड : Omicron Coronavirus : महाराष्ट्रासाठी चिंता व्यक्त करणारी बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट बनत आहे. गेल्या 24 तासांत पिंपरीत 7 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. गेल्या 15 दिवसांत पिंपरीत 19 रुग्ण आढळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलासादायक बाब म्हणजे, दहा जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. यात चार पुरूष आणि दोन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. तर इतर रुग्णांवर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.



महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा विळखा वाढत चालला आहे. राज्यात आणखी ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. याआधी पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबईत  रुग्ण सापडले होते. 


दरम्यान, ओमायक्रॉनचे तीन संशयित रुग्ण नांदेडमध्ये आढळले आहेत. हे तिघेही नांदेडमधल्या हिमायतनगरचे रहिवासी आहेत. दक्षिण अफ्रिकेतून ते तिघे आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ओमायक्रॉनचा संशय असल्याने त्यांचे नमुने तापासाणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यामुळे त्यांच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.