महाराष्ट्रात गुलाबी राजकारण! अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची खास ड्रेसिंग स्टाईल
अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनाही गुलाबी रंगाची भुरळ पडल्याचे दिसत आहे.
Devendra Fadnavis Pink Jacket : महाराष्ट्राच्या राजकारणात गुलाबी बहर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अजित पवार यांच्यापाठोपाठ फडणवीस यांनी देखील आपली ड्रेसिंग स्टाईल काहीशी बदलल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनाही गुलाबी रंगाची भुरळ पडल्याचे दिसत आहे. तसा बदल देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये पहायला मिळत आहे.
गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी स्टेज आणि आता गुलाबी रिक्षा... अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सर्व राजकारणच गुलाबी रंगात रंगवून टाकले आहे. याच गुलाबी रंगाची भुरळ भाजपला देखील पडल्याचे दिसत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या प्रमाणे गुलाबी जॅकेट परिधान करुन आले. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासारखेच गुलाबी जॅकेट परिधान केले आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या या गुलाबी राजकारणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातला गुलाबी रंग हा तसा नवा नाही. केसीआर यांच्या बीआरएसने महाराष्ट्रातही गुलाबी रंगाचं वादळ आणलं होतं. परंतु ते अचानक लुप्त झालं. आता याच गुलाबी रंगाला अजित पवार यांनी आपलसं केलेय. राष्ट्रवादीचं काम करणाऱ्या एजन्सीनं हा रंग सुचवल्याचं बोललं जातंय. मात्र दादांची ही ‘गुलाबी’ चाल विरोधी पक्षातल्या नेत्यांसह सर्वपक्षीयांना भुरळ घालून गेलीय. याची झलक मुंबईतल्या भाजपच्या कार्यकर्मात पहायला मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या प्रमाणे गुलाबी जॅकेट परिधान केले आहे.
फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचं 'मिशन 150'
देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र... आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पुन्हा एकदा आपले दोन्ही हुकमी एक्के मैदानात उतरवण्याची तयारी केलीय.. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपची संपूर्ण जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. विधानसभेच्या जागा ठरवण्याचे अधिकार फडणवीसांकडे असतील. मतदारसंघात फेरबदल करण्याचे अधिकारही त्यांनी देण्यात आल्याचं समजतंय. पक्षांतर्गत उमेदवार आणि मतदारसंघ निश्चितीची जबाबदारीही त्यांच्यावरच असेल. महायुतीतल्या मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकारही फडणवीसांकडे असणार आहेत.