मार्केटमध्ये धमाकूळ घालणार maruti suzuki dzire ची सनरुफ कार, 360 डिग्री कॅमेरा, जबरदस्त मायलेज आणि...

दिवाळीनंतर  मारुती सुझुकी धमका करणार आहे. Maruti Suzuki Dzire चं नवं व्हर्जन लाँच होणार आहे.

| Sep 17, 2024, 18:23 PM IST

Maruti Suzuki Dzire Sunroof : मारुती सुझुकीची Maruti Suzuki Dzire कार ही सर्वात लोकप्रिय सेदान कार आहे. कंपनी लवकरच या कारचे नवे अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. सनरुफ, 360 डिग्री कॅमेऱ्यासारखे लेटेस्ट फिचर्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  जबरदस्त मायलेज या कारमध्ये मिळणार आहे. 

 

1/7

Maruti Suzuki Dzire कार ही मारुतीची सर्वात लोकप्रिय सेदान कार आहे. या कारच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये लग्जरी फिल मिळणार आहे.  

2/7

नवीन स्विफ्टचे पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 24.8 किमी प्रति लीटर मायलेज देईल. पेट्रोल एएमटी व्हेरिएंट प्रति लिटर 25.75 किमी मायलेज मिळेल असा दवा कंपनीने केला आहे.  Dezire चे CNG व्हेरिएंट लाँच केले जाईल. 

3/7

360-डिग्री कॅमेरा, ट्राय-एरो एलईडी टेललाइट्स, बूटलिडवर इंटिग्रेटेड स्पॉयलर तसेच इंटेरियरमध्ये अपहोल्स्ट्री आणि डार्क कलरची डॅशबोर्ड अशी थीम मिळेल. 

4/7

नव्या कारमध्ये  मोठ्या ग्रिल, फुल LED हेडलॅम्प, एलईडी फॉग लाइट्स, नवीन फ्रंट आणि रियर बंपर आणि नवीन अलॉय व्हील यांचा समावेश आहे. 

5/7

व्हायरल फोटोनुसार नव्या Maruti Suzuki Dzire मध्ये सनरुफ मिळणार आहे. 

6/7

नव्या  Maruti Suzuki Dzire फोटो लिक झाले आहेत. या कारच्या टेस्ट ड्राईव्ह दरम्यानचे हे फोटो आहेत.   

7/7

नवी Maruti Suzuki Dzire  टाटा टिगोर, ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ या कारना टक्कर देणार आहे.