Action Against Sada Sarvankar: शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar)  यांच्या पिस्तुलीचा परवाना रद्द होणार आहे.  सदा सरवणकर यांच्या पिस्तुलीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झालीय, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis) दिली. दादरमध्ये (Dadar) शिंदे-ठाकरे गटात राडा झाला होता त्यावेळी सरवणकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यावर आता कारवाई सुरु झाली आहे.


काय झाला होता नेमका राडा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 या वर्षांत गणेशोत्सवादरम्यान मुंबईतल्या प्रभादेवी येथे  रवणकर-शिवसैनिकांमध्ये (Sada Sarvankar vs Shisena) राडा झाला होता. 13  सप्टेंबर 2022 रोजी प्रभादेवीत शिंदे आणि ठाकरे गटात मोठा वाद झाला होता. गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून हाणामारी झाली होती. त्यादरम्यान सदा सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेनं झाडली होती. 


सरवणकरांनी याबाबतचे सर्व आरोप तेव्हा फेटाळले होते.  यानंतर घटनास्थळावरुन काडतूस जप्त करण्यात आले. सदा सरवणकर यांच्या बंदुकीचे नुमने तसेच  काडतूस यांची तपासणी करण्यात आली. यांचे नमुने जुळले. या गोळीबार प्रकरणाचा अहवाल सादर झाल्यांनर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


सरवणकर यांनी गोळीबार केला नाही


शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही, असा अहवाल पोलिसांनी दिला होता. बंदूक सरवणकरांचीच होती पण गोळी दुस-या व्यक्तीनं चालवल्याचा या अहवालात उल्लेख करण्यात आला होता. सीसीटीव्ही तपासून 14 साक्षीदारांचे जबाब देखील पोलिसांनी नोंदवले होते. यानंतर सदरा सरवणर  यांच्यावर कारवाआ व्हावीत अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.