धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्रीजवळील दातर्ती गावात एका खासगी विमान प्रशिक्षण कंपनीचं विमान आपत्कालीन परिस्थितीत शेतात उतरवावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई फ्लाईंग क्लबचं हे विमान आहे. उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानाचं शेतात इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, अशी माहिती वैमानिक जे. पी. शर्मा यांनी दिलीय.


विमानात सहा प्रशिक्षणार्थी प्रवासी होते. त्यामध्ये एका महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे. या दुर्घटनेत दोघे प्रशिक्षणार्थी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.


हे विमान सूरतकडून धुळ्याकडं येत होतं. या अपघाताची बातमी संपूर्ण खान्देशात वायूवेगानं पसरली. अपघातामुळं नागपुर सुरत महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.