कोकण रेल्वे अत्याधुनिकीकरणाचा आराखडा सादर
कोकण रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणच्या मोहीमेचा आराखडा मांडण्यात आला आहे. त्यानुसार कोकण रेल्वेच्या १४७ किलोमीटरच्या ट्रॅकचं दुपदरी करणाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : कोकण रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणच्या मोहीमेचा आराखडा मांडण्यात आला आहे. त्यानुसार कोकण रेल्वेच्या १४७ किलोमीटरच्या ट्रॅकचं दुपदरी करणाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
या मार्गावर तब्बल २१ नवी स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरच्या दोन स्थानकांमधलं सरासरी अतंर १२.७५ वरून ८.३ किलोमीटर वर येणार आहे.
१४७ किलोमीटरच्या दुपदरीकरणासाठी ३००० कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यापैकी साधारण ३५ किलोमीटर दुपदरीकरण गोव्यात करण्यात येणार आहे.
याशिवाय कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठीही १ हजार ११० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.