योगेश खरे, झी 24 तास, नाशिक : अजूनही बऱ्याच ठिकाणी अगदी सहज प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. भाजीची देवाण घेवाण करण्यापासून अनेक दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आजही सऱ्हास चालू आहेत. मात्र प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेनं मोठी कारवाई चालू केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महापालिकेने शहरात आजपासून कोणतेही जाडी लांबी असलेलं प्लास्टिकचा वापर , विक्री , साठवणूक करण्यास महापालिका कार्यक्षेत्रात पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. प्लास्टिकसारख्या अविघटनशील कचऱ्यामुळे माणसांसह प्राण्यांमध्ये विविध आजार निर्माण होत आहेत. 


या वापराचा सार्वजनिक आरोग्यावर विपरीत होत असल्याने नाशिक शहर टास्क फोर्सने शहरात पूर्णतः प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पूर्णतः प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे . 


प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर 5 ते 25 हजारापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. यापूर्वी अंशतः बंदी वेळी व्यापारी विरुद्ध महापालिका संघर्ष पुन्हा एकदा वाद उफळणार असल्याचं दिसत आहे.