निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : मालेगाव शहरात मोठ्या  बेकायदा प्लास्टिक कारखान्यानी  बस्तान मांडले आहे त्यामुळे  आग लागण्याच्या  धोका वाढला आहे . त्यापासून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे  नागरिकांच्या  आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मालेगाव शहरातील म्हाळदे , द्यावे , दरेगाव शिवारात  १०० च्या   बेकायदा  प्लास्टिक कारखाने  सुरु आहे.   या कारखान्यांना  कुठल्याही प्रकारची  बांधकाम परवानगी नाही ना  प्रदूषण नियंत्रण मंडळाची  परवानगी. आग्निशामन  विभागाचे  सर्व नियम   धाब्यावर बसवून  बिनबोभाटपणे  सुरु असलेल्या  प्लास्टिक  कारखान्याच्या आवारात  ठेवलेल्या प्लास्टीकला उन्हामुळे आग लागून मानवी  जीवितास  धोका निर्माण  झाला  आहे . शहरात बेकायदा  चालणारे कारखाने  शहराबाहेर हटवावे अशी मागणी  जोर धरू लागली आहे .    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लास्टिक  जळाल्याने  विषारी धूरामुळे  मोठ्या  प्रमाणावर दुर्गंधी पसरत असल्याने  नागरिकांना  घरात राहणं कठिण झालंय. धुरामुळे  कॅन्सर , दमा ,  क्षयरोग व  श्वसनाचे  अनेक  दुर्धर आजार  नागरिकांना जडले आहेत. राजकीय वरदहस्त असल्याने  बेकायदा प्लास्टिक  कारखानदारांची मुजोरी  दिवसेंदिवस वाढत चालली आहे  


महापालिकेच्या  आग्निशामन  विभागाने  बेकायदा  प्लास्टिक कारखान्यांना नोटिसा बजावून  एक पाऊल पुढे टाकले आहे . आता महापालिकेच्या लोकप्रतिनिधी  व  प्रशासानाने  शहरातील नागरिकांच्या  जीविताला धोका निर्माण करणारे  बेकायदा प्लास्टिक  कारखाने शहरातून हद्दपार करण्यासाठी ठोस पाऊले  उचलण्याची गरज आहे