पुणे : प्लास्टिक विरोधात राज्यभरात सुरु असलेली कारवाई बेकायदेशीर आहे. हायकोर्टाचा अवमान करून कारवाई सुरु आहे. कारवाई थांबवली नाही तर, अवमान याचिका दाखल करू. असा इशारा प्लास्टिक म्यॅनुफॅक्चर्स असोसिएशन आणि किरकोळ विक्रेत्यांनी दिला आहे. 7 मार्च 2018 ला राज्य सरकारने हाय कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यानुसार, प्लस्टिक बंदीच्या कायद्याचा मसुदा तयार आहे. मंत्रिमंडळाची या मसुद्याला मंजुरी घेतली जाईल. त्यावर जनतेकडून सूचना - हरकती मागवल्या जातील. त्यानंतरच नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं जाईल.


प्लास्टिक बंदीसाठी ४५ दिवस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतरच प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी सुरु होईल, असं या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारनं म्हटलं होतं. त्यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागेल, असंही हाय कोर्टासमोर सांगण्यात आलं होतं.


प्लास्टिक बंदी लागू


मात्र, या सर्वांना फाटा देत अचानक गुढी पाडव्यापासून, प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. तसंच, कारवाई सुरु करण्यात अली आहे. असा आरोप करण्यात येतोय. याच विषयावर प्लास्टिक म्यॅनुफॅक्चर्स असोसिएशन आणि किरकोळ विक्रेत्यांशी साधलेला हा संवाद.