यवतमाळमध्ये कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा...
शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याने यवतमाळमध्ये कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले आहे.
कीटकनाशक फवारणीमुळे शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याने यवतमाळमध्ये कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. लाक्षणिक बंद असला तरी कारवाईचे पाऊल उचलल्या गेल्यास यापुढे बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशारा जिल्हा कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशनने दिला आहे. फवारणी चुकीच्या पद्धतीने झाल्याने शेतक-यांचे मृत्यू झाले आहे. या प्रकाराला कृषी निविष्ठा विक्रेते दोषी धरून त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई, परवाने रद्द, विक्री बंद आदेश अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येत असल्याने व्यवसाय सुरु ठेवणे कठीण झाल्याचे कृषी साहित्य विक्रेता संघाचे म्हणणे आहे.