नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आज 36 व्या मन की बातमधून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये पंतप्रधानांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील चंद्रपुराचा देखील पंतप्रधान मोदींनी खास करुन उल्लेख केला. चंद्रपुरातील इकोलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनाईजेशन या ऐन्जिओचं पंतप्रधानांनी कौतूक केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकोलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनाईजेशन या संस्थेने चंद्रपुरातील किल्ल्याची सतत २०० दिवस साफ-सफाई केली. हे स्वच्छतेचं अद्भूत उदाहरण असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. किल्ला स्वच्छ ठेवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ऐतिहासिक वास्तूंना सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्याचं काम आपलं आहे. असं देखील पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.


अनेक जण वेगवेगळ्या स्तरावर स्वच्छता करतात. लहान, युवा यामध्ये सगळ्यांचाच समावेश आहे. अस्वच्छता पाहून जर तुम्हाला वाटत असेल की स्वच्छता नाही होऊ शकतं तर तुम्ही या संस्थेच्या युवा वर्गाकरुन प्रेरणा घेऊ शकतात असं देखील म्हटलं. पंतप्रधान मोदींनी चंद्रपुरकरांचं अभिनंदन देखील केलं.