PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. आषाढी वारीसाठी सोमवारी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला.  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.


पंतप्रधान मोदी यांचे स्वागत सर्व वारकरी हे टाळ- मृदुंगाच्या गजरात केलं. त्यासाठी 200 ते 250 वारकऱ्यांना परवानगी मिळाली होती. यात टाळकरी, मृदुंगधारी, विणेकरी, पताका धारी, हंडाकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला अशांचा समावेश होता. 


मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे. पाण्याची बॉटल, चावी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसह काळे कपडे आणि मास्क ला सभास्थळी मनाई आहे.


देहूनंतर पंतप्रधान मुंबईत
देहू इथला कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान हे मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये 'जल भूषण' या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल.


पंतप्रधान आज मुंबईतील कार्यक्रमास उपस्थित राहणारेत. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलीस विभागानं वाहतुकीच्या मार्गात बदल केलेत. पंतप्रधान आज बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटर इथं येणारेत. त्यामुळे बीकेसीकडे येणारे आणि जाणारे सर्व रस्ते दुपारी 4 ते 8 पर्यंत पूर्णपणे बंद असणारेत. त्यानुसार प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.