Pm Modi Maharashtra Visit : यंदा लोकसभा आणि महाराष्ट्रात तर विधानसभा निवडणूक असल्याने प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. त्यामुळेच राज्य सरकारने विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरु केलाय. त्यात भाजपने तर मिशन महाराष्ट्रवर फोकस केलं आहे. लहान मोठ्या शहरांमधील अनेक कामांचं उद्घाटन करण्यात येत आहे. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महाराष्ट्राकडे विशेष प्राधान्य दिल्याच दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. (Pm Modi Maharashtra Visit Jalgaon on 5 february Yavatmal on 11 february pune on 19 february 2024 visiting shivneri fort BJP Lok Sabha Mission Maharashtra)


मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लोकसभा निवडणूक, 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी तीन वेळा महाराष्ट्रात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदी महाराष्ट्रात 5, 11 आणि 19 फेब्रुवारीला येणार आहेत. 


नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील तर नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी माहिती समोर आलीय...तर 19 फेब्रुवारीला पुण्याच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पुण्याच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हे शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील दोन महिन्यात मुंबई, नाशिक आणि सोलापूरनंतर पुण्यातला चौथा येत आहेत. मुंबईतील दौऱ्यात मोदींनी अटल सेतूच्या लोकार्पण केलं होतं. त्याशिवाय 30 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केलं होतं. तर नाशिक दौऱ्यात राष्ट्रीय युवा महोत्सवाला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्याशिवाय सोलापूरला त्यांनी 15 हजार घरकुलांचे लोकार्पण केलं होतं.