नवी दिल्ली : संपूर्ण आयुष्य केवळ 'शिवाजी' या तीन अक्षरांसाठी जगणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली आहे. मोदींनी या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या ९६ वर्षात पदार्पण केलं असलं तरीही महाराजांच्या कार्याप्रती त्यांची असलेली निष्ठा आणि तळमळ एखाद्या तरूणाला देखील लाजवेल अशी असते. नरेंद्र मोदी यांनी या भेटीचे फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, मला खूप अभिमान आहे की एका अद्भुत व्यक्तिमत्वाची आज माझी भेट झाली. ज्या व्यक्तीला मी गेले कित्येक वर्ष ओळखत आहे. 



त्याप्रमाणे दुसऱ्या ट्विटमध्ये आपण पाहू तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मोदींना जरीची पगडी आणि उपरण भेट म्हणून दिली. यातून असंच वाटतं की, मोदी देखील शिवाजी महाराजांचे मावळे बनले आहेत. आणि त्यांनी देखील देशसेवेची पताका हाती घेतली आहे. 



मोदी म्हणतात की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे मोदींनी या भेटीचं कौतुकचं केलं आहे. ‘उभं आयुष्य छत्रपती शिवाजीमहाराज आणि त्यांचा काळ शोधण्यात गेलं. अजूनही हे कार्य अपुरं वाटतं. ते पूर्ण करण्यासाठी अजून एक आयुष्य मिळावं..!’असं कायम शिवशाहीर पुरंदरे यांना वाटतं.