बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणातपीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक  चेअरमन वरियम सिंग आणि बँकेचे काही पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून फसवणूक करणे कट रचणे असे काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या तपासासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. आरबीआयच्या आदेशावरुन एचडीआयएल आणि बँकेच्या दहा पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमसी बँकेचा घोटाळा 4335 कोटींचा असल्याचंही समोर आलं आहे. हा पैसा बनावट खात्यांवर वळवला गेल्याची माहिती समोर येते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग आणि बँकेचे काही पदाधिकारी यांचा समावेश आहे. बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी ऑगस्ट 2008 ते 2019 या कालावाधीत भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसताना ही माहिती आरबीआयपासून लपवली. कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली. या सगळ्यामुळे 4335 कोटी रुपयांचे नुकसान बँकेला झाले. याच पैशांमधून हा गैरव्यवहार झाला. 



हा सगळा गैरव्यवहार हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीच्या पुढाकारातून झाला असेही समजते आहे. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा कट रचला. कर्जाची परतफेड न करता त्या रकमेचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी केला. त्याचमुळे कलम 409, 420, 465, 466, 471, 120 (ब) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.