PMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाकडून तब्बल 21 हजार जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात शिक्षक विभागानं प्रसिद्ध केलीय. यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. अनेक वर्षांपासून या भरतीची प्रतिक्षा केली जात होती. आता या उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झालेापासून 30 दिवसाच्या आत अर्ज करता येणार आहे. शासनाची अधिकृत वेबसाईट tait2022.mahateacherrecruitment.org.in वर यासंदर्भात अर्ज करता येणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


पुणे पालिकेच्या शिक्षण सेवक भरतीअंतर्गत एकूण 619 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी शासन नियमानुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करु शकतात. 7 फेब्रुवारी रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 


प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे-05 येथे ही भरती केली जाणार आहे. पुणे पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मराठी अनुदानित, उर्दू अनुदानित आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात. या अंतर्गत मराठी माध्यमाची 378 पदे, उर्दू माध्यमातील 43 पदे आणि इंग्रजी माध्यमातील 198 पदे भरली जाणार आहेत. पवित्र पोर्टलवर याचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे.


शिक्षक भरतीचा तपशील 


शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीच्या जाहिराती https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx  या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला होम, डाउनलोड आणि एफएक्यू असे पर्याय दिसतील. त्यातील डाऊनलोडवर क्लिक करा. आता तुम्हाला उमेदवारांना मुलाखती शिवाय भरल्या जाणाऱ्या जागा आणि मुलाखती घेऊन भरल्या जाणाऱ्या जागा दिसतील.


आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात किती आणि कोणत्या संवर्गासाठी जागा रिक्त आहेत याचा तपशील मिळेल. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरती संदर्भातील पुढील प्रक्रियेची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मॅन्युअलही प्रसिद्ध करण्यात आले आहे. 


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


पुणे पालिकेच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा