नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : विकासकामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेन एक पाऊल पुढं टाकलं आहे. विकासकामांना निधी उभारण्यासाठी महापालिका म्युनिसिपल बॉण्ड्स भांडवल बाजारात आणणार आहे. म्युनिसिपल बॉण्ड्स मधून पुणे महापालिका बाविशे कोटी रुपये उभारणार आहे. त्यामुळं, बाँड्सच्या विक्रीतून निधी उभारणारी पुणे देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महापालिकेचे बाँड्स लवकरच भांडवल बाजारात दाखल होणार आहेत... बाँड्सच्या विक्रीतून महापालिका २२६५ कोटी रुपये उभे करणार आहे. त्यातून महापालिकेची चोवीस तास पाणीपुरवठ्याची महत्वाकांक्षी योजना वेळेत पूर्ण करणार आहे. सेबीने २०१५ मध्ये म्युनिसिपल बॉण्ड्ससाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यानंतर, पुणे महापालिका या संधीचा फायदा घेत निधी उभारण्यासाठी पुढे सरसावली आहे... 


बाँड्सच्या विक्रीतून विकासकांनसाठी निधी उभी करणारी पुणे हि देशातील पहिला महापालिका ठरणार आहे... एव्हढंच या म्युनिसिपल बॉण्ड्स महत्व नाही. तर, विविध कर, केंद्र आणि राज्य सरकारचा निधी आणि कर्ज या व्यतिरिक्त विकासकामांसाठी निधी उभारण्याचं नवीन माध्यम स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जा पेक्षा कमी व्याजदर बॉण्ड्स साठी द्यावा लागणार आहे. हा या बॉण्ड्सचा मोठा फायदा आहे. त्याचबरोबर कर्जप्रमाणे बॉण्ड्ससाठी कुठली मालमत्ता महापालिकेला तारण ठेवावी लागणार नाही. 


महापालिका २२६५ कोटी रुपये बॉण्ड्स मधून उभारणार असली तरी, एकदाच काही सर्व बॉण्ड्स विक्रीला येणार नाहीत. तर, जशी निधीची गरज पडेल तेव्हढ्या किमतीचे बॉण्ड्स पालिका बाजारात आणेल. त्यामुळं , महापालिकेचा व्याजाचा खर्च वाचणार आहे. 


म्युनिसिपल बॉण्ड्स बाजारात आणण्याची महापालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी यूएस ट्रेझरी पुणे महापालिकेला एक वर्ष मोफत मार्गदर्शन करणार आहे. तर, प्रत्यक्ष बॉण्ड्स काढण्याची प्रक्रिया आणि  पुढील व्यवस्थापनासाठी या क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीबरोबर करार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. निधी उभारण्यासाठी बॉण्ड्स काढण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाचं स्वागत या क्षेत्रातील जाणकारांनी केलं आहे. 


निधी उभारण्यासाठी पुणे महापालिका काढणार असलेले बॉण्ड्स, म्युचल फंड्स , पीएफ ट्रस्ट , इन्शुरन्स कंपन्या यानं घेता येणार आहेत... त्यामुळं पुणे महापालिकेचे पहिले वाहिले बॉण्ड्स सामान्य पुणेकरांना मात्र घेता येणार नाहीत.