विषारी ताडी बनवणारा म्होरक्या गजाआड
याप्रकरणी मालकाला अटक केली असून दोन प्रमुख सूत्रधार यामध्ये फरार आहेत.
नाशिक : ताडी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरल हायड्रेट मधील विषारी मिश्रणामुळे गेल्या काळात राज्यात अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आला होता. नाशिक जिल्ह्यातही असे प्रकार घडले होते. असे असताना रासायनिक मिश्रण करून ताडी बनवण्यासाठीचे ड्रग केमिकल दिंडोरी तालुक्यात तयार होत असल्याचे मुंबई पोलिसांनी उघड केले आहे. याप्रकरणी मालकाला अटक केली असून दोन प्रमुख सूत्रधार यामध्ये फरार आहेत.
नाशिक पासून 40 किलोमीटर दिंडोरी पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर लखमापूर हे गाव आहे. या गावातील हा अल्फा सॉलव्हेंट नावाचा कारखाना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आतापर्यंत येथे काहीतरी रासायनिक कारखाना म्हणून बघितले जात होते. पण हा कारखाना अनेकांचे जीव जाण्यास कारणीभूत ठरणारा ठरला. ताडी बनवण्यासाठी लागणारे केमिकल या कारखान्यात तयार होत असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी छापा टाकत यावर कारवाई केली आहे. या ठिकाणाहून सत्तर लाख रुपये किमतीचे ड्रग केमिकल हस्तगत करण्यात आले आहेत.
आरे पोलिसांच्या हद्दीत मोडणाऱ्या युनिट १ आणि ३१ मध्ये खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ही कारवाई केली. मुंबईतील २५० ताडीच्या दुकानांना क्लोरल हायड्रेट या विषारी ड्रग केमिकलचा पुरवठा करणाऱ्या व्यंकटा करबुग्याला त्याच्या अन्य दोन साथीदारांसह अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून ४५ लाख ३४ हजार ३०० त्याच्या रुपयांचे केमिकलही हस्तगत केले होते. व्यंकटा याच्या चौकशीत नाव उघड झालेला आणि सध्या पसार असलेला आरोपी प्रकाश ऊर्फ पप्पू गोपवाणी हा कांदिवलीच्या महावीरनगर परिसरात राहत असल्याचा संशय आहे. तो हाती आल्यास राज्यातील अवैध ताडी कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे