कीटकनाशक फवारणीने अजून एका शेतकर्याचा मृत्यू
कीटकनाशक फवारणीतून शेतकऱ्यांचा मृत्यूचे लोण आता भंडारा जिल्ह्यात सुद्धा हळूहळू पसरायला लागलंय.
भंडारा : कीटकनाशक फवारणीतून शेतकऱ्यांचा मृत्यूचे लोण आता भंडारा जिल्ह्यात सुद्धा हळूहळू पसरायला लागलंय.
मोहाडी तालुक्यात एक शेतकऱ्याचा कीटकनाशक फवारणी दरम्यान मृत्यू झालेला आहे. तालुक्याच्या कांद्री गावातील ५० वर्षीय प्रभू भूराडे यांनी दिवसभर शेतामध्ये औषध फवारणी केली. त्यानंतर घरी आल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनी मृत शेतकऱ्याचा कुटुंबीयांची भेट देत सांत्वन केलं. गेल्या १० दिवसात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.